शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

संपूर्ण विश्वात सामुहिकरित्या नवकार महामंत्र जप होणे ही ऐतिहासिक कामगिरी – विमलश्री माताजी

---Advertisement---

श्रीरामपूर : संपूर्ण विश्वात सामुहिकरित्या नवकार महामंत्र जप होणे ही ऐतिहासिक कामगिरी आहे,” असे प्रतिपादन थ्रुत संवर्धिका श्रमणी आर्यिका विमलश्री माताजी यांनी केले. श्रीरामपूर, 9 एप्रिल 2026 रोजी भारतासह जगभरातील 108 देशांमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या ऐतिहासिक उपक्रमाचा भाग म्हणून शहरातही सकल जैन समाजच्यावतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास सकल जैन समाजातील श्रावक-श्राविका, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच इतर समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास प्रतिसाद दिला. यावेळी दिगंबर जैन मंदिरच्या थ्रुत संवर्धिका श्रमणी आर्यिका विमलश्री माताजी ,आर्यिका वितपश्री माताजी, आर्यिका विभाव्यश्री माताजी, क्षुल्ली प्रमाश्री माताजी ससंघ सान्निध्यात कार्यक्रम संपन्न झाला. आपल्या प्रवचनामध्ये थ्रुत संवर्धिका श्रमणी आर्यिका विमलश्री माताजीनी नवकार महामंत्राचे महत्व सांगत, ” नवकार महामंत्रामध्ये असलेली विश्वशांतीची ऊर्जा प्रत्येकाला अनुभवता आली, असेही ते म्हणाले. नवकार महामंत्र कलश घेण्याचा मान राजेंद्र रसिकलाल बडजाते परिवारला आर्यिका विमलश्री माताजी यांच्या हस्ते देण्यात आले. प्रास्ताविक दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष सुमित काला यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष सुमित काला, उपाध्यक्ष राजेंद्र झांजरी, विश्वस्त गुलाब झांजरी ,मनोज पापडीवाल ,माजी अध्यक्ष संजय कासलीवाल, अनिल पांडे , सुभाष चुडीवाल राजेंद्र पाटणी, विजय सोनी ,नंदलाल पापडीवाल, अनिल चुडीवाल, राजू कासलीवाल ,राजू पांडे, प्रितम पांडे, राजेंद्र बडजाते, आनंद पापडीवाल, पंकज गोधा, मनोज ठोळे, रोमित पाटणी, झांजरी यांनी विशेष मेहनत घेतली. सुमारे 300 हून अधिक नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेल्य सामूहिक पठणामुळे एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली, ज्याचा लाभ निश्चितच विश्वशांतीसाठी होईल, असा विश्वास सर्वउपस्थितांनी व्यक्त केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment