शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

धांदरफळ वीज उपकेंद्राची क्षमता केली दुप्पट!

---Advertisement---

आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा

संगमनेर :प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील धांदरफळ वीज उपकेंद्रावरील ट्रान्सफॉर्मरची क्षमता आ.अमोल खताळ यांच्या विशेष पाठपुराव्यातून ५ एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर आता१० एमव्हीए केला आहे.या ट्रांसफार्मरचे काम पूर्णत्वास आले असून लवकरच त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. धांदरफळ वीज उपकेंद्रांवर गेल्या काही महिन्यांपासून अतिरिक्त भार येत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दाबाने तसेच अपुऱ्या प्रमाणामध्ये वीजपुरवठा होत होता. परिणामी शेतीपंप सुरळीतपणे चालवणे कठीण झाले होते आणि पिकांच्या सिंचनावर त्याचा विपरीत परिणाम होत होता. ही गंभीर समस्या परिसरातील सर्वच शेतकऱ्यांनी आमदार खताळ यांच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत आमदार.अमोल खाताळ यांनी महावितरण कंपनी प्रशासना कडे सातत्याने पाठपुरावा करत अनेक दिवसापासून प्रलंबित पडलेला प्रश्न मार्गी लावला .त्यांच्या प्रयत्नां मुळे धांदरफळ उपकेंद्रातील ट्रान्स फॉर्मरची क्षमता दुप्पट करण्यात आली आहे.या निर्णयामुळे धांदरफळ व परिसरातील गावांमध्ये अधिक स्थिर व पुरेसा वीज पुरवठा मिळणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे या कामामुळे परिसरा तील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत आमदार अमोल खताळ यांचे आभार मानले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment