शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

राहुरीत अंधश्रद्धेविरोधात नव्या लढ्याची नांदी

---Advertisement---

अंनिसच्या तालुका अध्यक्षपदी प्रा. वसंतराव झावरे; कार्याध्यक्षपदी डॉ. जालिंदर घिगे यांची निवड

सोनगाव : समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद आणि पुरोगामी विचार रुजविण्यासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राहुरी तालुका कार्यकारिणीची निवड गुहा (ता. राहुरी) येथील गंगाधर बाबा छात्रालयात उत्साहात पार पडली. या बैठकीत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ तथा माजी प्राचार्य प्रा. वसंतराव झावरे यांची तालुका अध्यक्षपदी, तर सामाजिक कार्यकर्ते डॉ. जालिंदर घिगे यांची कार्याध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर अनाप होते. यावेळी विविध विभागांसाठी पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली.उपाध्यक्षपदी दिपक मेहेत्रे व डॉ. रोहित बोरावके, सचिवपदी संजय चव्हाण, तर सहसचिवपदी साईनाथ रणधीर यांची निवड झाली. बुवाबाजी संघर्ष विभागासाठी योगेश तनपूरे व जालिंदर मुसमाडे, वार्तापत्र व प्रकाशन विभागासाठी प्रशांत देशमुख व विकास धनवडे, वैज्ञानिक जाणीव प्रकल्पासाठी बबनराव लांडगे, स्वप्निल कडू व शुभम साबळे यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली.मानसिक आरोग्य विभाग प्रमुख म्हणून डॉ. पूनम साबळे व डॉ. कौस्तुभ भागवत, महिला विभाग प्रमुख म्हणून सोनल झावरे, तर युवा विभाग प्रमुख म्हणून मनोज खाटेकर यांची निवड करण्यात आली. विवेक वाहिनी विभागासाठी पवन कडू व महेश घोलप, प्रशिक्षण विभागासाठी प्रा. अरुण तुपविहिरे व अनिरुद्ध मोरे, सांस्कृतिक विभागासाठी हरेश्वर साळवे व कुमार अंत्रे, तर सोशल मीडिया प्रसिद्धी विभाग प्रमुख म्हणून स्वप्निल दिघे व आदेश अंत्रे यांची नियुक्ती झाली.जातीअंत विभागासाठी युसुफभाई देशमुख व कुमार भिंगारे, विविध उपक्रम विभागासाठी प्रशांत शिंदे व अशोक पवार, तर कायदा विभागासाठी ॲड. प्रवीण चोखर व ॲड. अक्षय धनवटे यांची निवड करण्यात आली. सदस्यपदी प्रकाश सपकाळ, राहुल विधाते, योगेश व कैलास पलघडमल यांचा समावेश करण्यात आला.बैठकीस रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य किरण कडू, नगर शहर शाखेचे कार्याध्यक्ष राजेंद्र कर्डिले, समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष मच्छिंद्र गुलदगड, जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे, कृषी अधिकारी बाबासाहेब मुसमाडे तसेच छात्रालयाचे प्रकाश (पप्पू) सकपाळ उपस्थित होते. यावेळी किरण कडू व नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. किरण कडू यांची शाखेच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली.यावेळी प्रा. वसंतराव झावरे व किरण कडू पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. जालिंदर घिगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.“अंनिस कोणत्याही धर्माविरोधात नाही”अध्यक्षीय मनोगतात जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर अनाप यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “अंनिस ही कोणत्याही देवा-धर्माच्या विरोधात नसून शिव, शाहू, फुले, आंबेडकर तसेच संत परंपरेतील पुरोगामी विचार समाजात रुजविण्याचे कार्य करत आहे. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकी विचार पोहोचविण्यासाठी समिती सातत्याने प्रयत्नशील आहे.”“बुवाबाजी, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी व परंपरांच्या माध्यमातून समाजाचे सामाजिक, आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात समिती ठामपणे लढा देत राहील,” असेही अनाप यांनी स्पष्ट केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment