शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या धीरेंद्र शास्त्री यांच्यावर तातडीने कारवाई करा

---Advertisement---

आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानाचा देखील निषेध करण्यात आला.

जिल्हा काँग्रेसच्या वतीने प्रशासनाला निवेदन

श्रीरामपूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्यावर तातडीने कारवाई करा तसेच आमदार संजय गायकवाड यांनी महिलांबद्दल अपशब्द वापरले त्यांच्यावर देखील त्यांच्यावर देखील कडक कारवाई करा अशा मागणीचे निवेदन जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रशासनाला देण्यात आले आहे.
यावेळी आमदार हेमंत ओगले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाची मोडतोड करून चुकीच्या पद्धतीने महाराजांच्या संदर्भात वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री यांचा निषेध करतो तसेच त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदार ओगले यांनी केली.
नगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जाणीवपूर्वक कोणीतरी पुसण्याचा प्रयत्न करत आहे वेळीच अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालावा लागेल असे म्हटले आहे.
जिल्हाध्यक्ष सचिन गुजर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल जाणीवपूर्वक अपशब्द वापरून इतिहासाची मोडतोड करणाऱ्या वीरेंद्र शास्त्री यांचा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मी निषेध करतो सगळ्यात गंभीर बाब म्हणजे हे व्यक्तव्य ज्यावेळी जितेंद्र शास्त्री यांनी केले त्याच व्यासपीठावर मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक देखील उपस्थित होते आणि त्यांच्या समोरच महाराजांचा अपमान होत असताना त्याचा विरोध न करता केवळ त्यांनी बघ्याची भूमिका घेतली तरी धर्मेंद्र शास्त्री यांच्यावर तातडीने कारवाई करा असे म्हटले.
निवेदनावर माजी सभापती बाबासाहेब दिघे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, मार्केट कमिटीचे सभापती सुधीर नवले, तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले, शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, पंडितमामा बोंबले, सभापती योगेश जाधव, दिपक वमने, अशोक शिवरकर, फिरोज शाह, सुभाष पोटे, कलीम कुरेशी, रितेश एडके, रवींद्र खिलारी, रज्जाक पठाण, सागर भागवत, नवाज जहागिरदार, सुधीर वायखिंडे, रावसाहेब आल्हाट, रणजीत पाटील, रितेश चव्हाणके, अमोल नाईक, पुंडलिक खरे, सुनील साबळे, अशोक जगधने, सुरेश ठुबे, संजय गोसावी, वैभव रासने, सनी मंडलिक, राजेश जोंधळे, सागर दुपाटी यांच्यासह आदींच्या सह्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment