श्रीरामपूर : राहाता तालुक्यातील वाकडी येथील खंडोबा मंदिरास मूळ साकुरी येथील रहिवाशी व हल्ली अहिल्यानगर येथे स्थायिक असलेले मल्हारी भक्त रमेश जयराम धापटकर यांनी त्यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ पोलाद धातू असलेली तलवार भेट दिली. त्याकाळी खंडेराय महाराजांच्या वापरात असलेल्या तलवारीसारखीच ही हुबेहूब तलवार आहे.
राहुल धापटकर व अभिजित धापटकर यांनी ही तलवार वाकडी गावात आणल्यावर सदरील तलवारीचे वाजत गाजत भंडारा उधळण करून खंडोबा मंदिरपासून गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर ही तलवार ग्रामस्थ व खंडोबा देवस्थानच्या ताब्यात देण्यात आली. खंडेराय महाराज बानुबाईला आणण्यासाठी चंदनपुरी जात असताना त्याकाळी वाकडीत मुक्काम केला होता. त्यावेळी त्यांच्या हातात असलेल्या तलवारीची हुबेहूब प्रतिकृती असलेली तलवार (खंडा) धापटकर बंधुंनी वाकडीच्या खंडोबा मंदिरास भेट दिली. सुमारे साडेबावीस किलो वजनाची ही तलवार खंडोबा मंदिरात ठेवण्यात आली आहे.
वाकडीच्या खंडोबा मंदिरास मल्हारी भक्तांकडून तलवार भेट







