शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

मा कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत 17 ते 19 मे रोजी ऊस विकास मेळाव्यांचे आयोजन

---Advertisement---

जोर्वे, खांडगाव ,साकुर व तळेगाव येथे ऊस विकास मेळावा

संगमनेर – संपूर्ण देशातील सहकारासाठी आदर्शवत असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने रविवार दिनांक 17 मे 2026 ते 19 मे 2026 या कालावधीमध्ये तालुक्यात विविध ठिकाणी माजी कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, व माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ऊस विकास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती व्हाईस चेअरमन पांडुरंग पा. घुले यांनी दिली आहे.
कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस लागवड क्षेत्रात प्रती हेक्‍टरी वाढ व्हावी याकरता महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते मा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ऊस विकास मेळाव्यांचे आयोजन होत आहे
रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी साडेनऊ वाजता जोर्वे येथील शिव ओंकार लॉन्स येथे हा ऊस विकास वाढ मेळावा होणार आहे यावेळी मा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या सर्व पदाधिकारी व त्या त्या विभागातील कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित राहणार आहे. यावेळी व्हीएसआय मधील कृषी शास्त्र व तंत्रज्ञान विभागातील मुख्य शास्त्रज्ञ डॉ अशोक कडलग त्याचप्रमाणे कृषी विद्या विभागाचे डॉ अभिनंदन पाटील, माती परीक्षण विभागाचे शास्त्रज्ञ डॉ समाधान सुरवसे व ऊस पैदासकार विभागातील मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सुशील कपिल ही उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
रविवार 17 मे रोजी सायंकाळी पाच वाजता खंडेश्वर मंदिर सांस्कृतिक भवन येथे हा मेळावा होणार आहे.
तर सोमवार दिनांक 18 मे 2026 रोजी सायंकाळी पाच वाजता साकुर येथील वीरभद्र लॉन्स येथे हा ऊस विकास मेळावा होणार आहे तसेच मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता तळेगाव दिघे येथील महाराजा लॉन्स येथे वरील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ऊस विकास मेळावा होणार आहे.
तरी या ऊस विकास मेळाव्यासाठी कार्यक्षेत्रातील व तालुक्यातील सर्व सभासद, शेतकरी, ऊस उत्पादक, कार्यकर्ते, नागरिक ,युवक व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे सर्व संचालक मंडळ, आवाहन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, व शेतकी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment