श्रीरामपूर : येथील सनफ्रेश ॲग्रो इंडस्ट्रिज प्रा. लि. यांनी आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान राखत साखर कामगार हॉस्पिटलला अत्याधुनिक रुग्णवाहिका प्रदान केली आहे. या उपक्रमामुळे परिसरातील रुग्णांना तातडीने आणि अधिक कार्यक्षमतेने वैद्यकीय सेवा मिळण्यास फायदा होणार आहे. साखर कामगार हॉस्पिटलमध्ये सुसज्ज रुग्णवाहिका देऊन, कंपनीने रुग्णालय प्रशासनाला एक महत्त्वपूर्ण सहकार्य केले आहे. यामुळे, आपत्कालीन सेवेत वेग आणि कार्यक्षमता वाढेल आणि गंभीर रुग्णांना त्वरित आणि सुरक्षितपणे उपचारासाठी हलविणे सोपे होईल. या कार्यक्रमाला कंपनीचे प्लांट हेड विजय गजभिये, क्वॉलिटी हेड जुबेर अली खान तसेच मानव संसाधन विभागाचे ललित घोडके, संजय पटेल, बाळासाहेब खरात, मंगेश यादव, रामअशिश यादव, साखर कामगार हॉस्पिटल ट्रस्टचे सचिव अविनाश आपटे, विश्वस्त ज्ञानदेव आहेर, वैद्यकीय संचालक डॉ. रवींद्र जगधने, डॉ. शरद सातपुते आणि इतर मान्यवर उपस्थित होते.कंपनीच्या या उपक्रमाचे स्वागत करत, हॉस्पिटल प्रशासनाने सनफ्रेश ग्रो इंडस्ट्रिजचे आभार व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, हे रुग्णवाहिका अत्यंत उपयुक्त ठरेल आणि परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढवण्यास मदत करेल.
साखर कामगार हॉस्पिटलला अत्याधुनिक रुग्णवाहिका भेट







