शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

आळंदीत मंगळवारपासून सुडके महाराजांची ‘अहिल्यादेवी चरित्र कथे’ चे आयोजन

---Advertisement---

सोनई : कांगोणी (ता.नेवासा) येथील संत सुडके महाराज आश्रमाचे प्रमुख बाळकृष्ण महाराज सुडके यांच्या सुश्राव्य वाणीतून आळंदी देवाची येथे मंगळवार (ता.२६) पासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चरित्र कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहात २६ ते ३१ मे २०२६ या कालावधीत ज्ञानेश्वरी पारायण, किर्तन महोत्सव व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती ओंकार महाराज सुडके यांनी दिली.आळंदी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी धर्मशाळेत संत ज्ञानेश्वर महाराज सप्त शतकोत्तर तर अहिल्यादेवी जन्म शताब्दीनिमित्त होत असलेल्या सोहळ्यात पहाटे काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी तीन ते पाच वाजता चरित्र कथा, सायंकाळी सहा ते आठ वाजता किर्तन व रात्री संगीत भजन कार्यक्रम होणार आहे. किर्तन महोत्सवात ज्ञानोबा माऊली(चाळीसगाव) ज्ञानोबा महाराज कु-हाडे, डाॅ. नारायण महाराज जाधव, परमेश्वर महाराज जायभाय व रामायणचार्य रामराव महाराज ढोक यांचे किर्तन होणार आहे. रविवार (ता.३१) रोजी सकाळी दहा ते बारा वाजता सुडके महाराज यांचे काल्याचे किर्तन व मांडे भोजन महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment