लोणी : लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे, प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, लोणी येथील देशभरातील नामवंत फार्मसी महाविद्यालयांमध्ये एम. फार्मसी या पदव्युतर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एन टी ए) मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षेमध्ये सहा तसेच, अभियांत्रिकी आणि विज्ञान क्षेत्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या भारतीय विज्ञान संस्था आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत दोन विध्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले, अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. के. मंगाथायारू यांनी दिली.
महाविद्यालयातील जी पॅट परीक्षेत चतुर्थ वर्ष पदवी अभ्यासक्रमातील विध्यार्थी कु. संजना गाडेकर , कु. चैताली ढोकणे , कु. राजश्री डांगे , कु. संजना भालेराव , कु. अश्विनी मेंगळ , चि. अनिकेत जाधव या सहा विद्यार्थ्यांनी तसेच गेट परीक्षेत कु. शैलेश सोळंके , कु. वैभव गुंजकर या दोन विध्यार्थ्यांनी यश संपादान केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व यशस्वी विध्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, यांनी तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. के. मंगाथायारू व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
जी-पॅट आणि गेट परीक्षेमध्ये प्रवरा औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय लोणीच्या विध्यार्थ्यांचे यश







