शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांचे विचार आचरणात आणा : प्राचार्य डॉ.राम पवार

---Advertisement---


कोल्हार :- लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राम पवार होते, तर वक्ते म्हणून प्रा.साईप्रसाद कुंभकर्ण उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी प्राध्यापक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात प्राचार्य डॉ.राम पवार यांनी समाजसुधारक महात्मा फुले यांच्या कार्याचा आढावा घेत, समाजातील शोषित आणि वंचित घटकांसाठी त्यांनी केलेल्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. “महात्मा फुले यांनी दिलेले समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचे विचार केवळ वाचण्यापुरते न ठेवता ते आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन डॉ.राम पवार यांनी केले.
तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव ठेवून कार्य करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्ञानेश्वर रांधवणे, तर आभार प्रदर्शन डॉ.शांताराम चौधरी यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीतील सर्व सदस्य प्रयत्नशील होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment