लोणी दि.८ प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील चणेगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकत्याच घेण्यात आलेल्या लक्षवेध परिक्षेमध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यासह राज्यपातळीवर घवघवीत यश संपादन केलेले आहे. अशी माहीती मुख्याध्यापिका संगिता शेलार यांनी दिली. या स्पर्धेप इयत्ता पहिली मध्ये कु.मिताली रविंद्र खेमनर (राज्यात १९ वी), कु.कृतिका सुनिल दिघे (राज्यात ३३ वी), तर चि.हर्षवर्धन संजय ढमक (राज्यात ३५ वा) तसेच इयत्ता दुसरी मध्ये कु.अपेक्षा मच्छिंद्र बिडगर (राज्यात २९ वी), कु.वेदिका गणेश पाटोळे (राज्यात ३७ वी) तर कु.वेदिका माधव खेमनर (राज्यात ४३ वी) इयत्ता तिसरी मध्ये कु.सायली रामेश्वर खेमनर (राज्यात २३ वी), चि.राम रोशन गुळवे (राज्यात ४१ वा) तर कु.राजनंदिनी शंकर शिंदे (राज्यात ५६ वी) इयत्ता चौथी मध्ये चि.समर्थ अनिल गुळवे (राज्यात ३४ वा) कु.अपूर्वा मच्छिंद्र बिडगर (राज्यात ३५ वी) तर कु.आदिती चांगदेव खेमनर (राज्यात ४८ वी) अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी आपले ग्रामीण भागातील मराठी माध्यमाच्या शाळेचे नाव जिल्हा पातळीसह राज्यपातळीवर पोहचवण्याचे काम यामाध्यमातुन केलेले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या राजेंद्र जोशी, वाळिबा वाळेकर यांचेसह शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चणेगांवच्या विद्यार्थ्यांचे लक्षवेध परिक्षेत घवघवीत यश







