लोणी: लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या चिंचोली (सिन्नर) येथील सिंधूछाया कॅम्पमधील सर विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (SVIT) येथे आयोजित दोन दिवसीय भव्य तांत्रिक महोत्सवात महाविद्यालयातील विविध शाखांच्या विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण संशोधन मॉडेल्स सादर करत उल्लेखनीय यश संपादन केले, अशी माहिती प्राचार्य डॉ. सारंग पांडे यांनी दिली.
या तांत्रिक महोत्सवात ‘हॅकव्हर्स’, प्रोजेक्ट स्पर्धा, बिझनेस प्लॅन कॉन्टेस्ट, पेपर प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन तसेच ‘इंडियन नॉलेज सिस्टीम’ अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये विविध महाविद्यालयांतील ९०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या महोत्सवामुळे विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची संधी मिळाली. तसेच नाविन्यपूर्ण विचार मांडण्याची क्षमता, टीमवर्क, सादरीकरण कौशल्ये आणि उद्योजकतेची जाणीव विकसित झाली. उद्योग क्षेत्राशी निगडित अनुभवामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांच्या करिअर व प्लेसमेंटच्या संधींना चालना मिळाली.
या स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून श्री. आर्य चांडोरकर, सौ. स्वरदा ओगले, श्री. मनुज चौधरी, श्री. तेजस रामटेके, श्री. ज्ञानेश्वर तिडमे, श्री. अथर्व वैकर, श्री. साहिल असलम शेख, डॉ. सतीश बोरनारे आणि श्री. अमोल साबळे यांनी काम पाहिले.
तसेच या तांत्रिक महोत्सवासाठी टेनएआय कन्सल्टिंग इंडिया प्रा. लि., नाशिक, आर३ सिस्टिम्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सॉफ्टक्राउड टेक्नॉलॉजीज प्रा. लि., प्रवरा इन्फोटेक प्रा. लि., एरोबिक्स एआय प्रा. लि., नेटलीप आयटी ट्रेनिंग अँड सोल्युशन्स, वायएसएम इन्फोसोल्युशन, विझडम स्प्राउट्स आयटी ट्रेनिंग हब आदी कंपन्यांनी प्रायोजकत्व दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. सारंग पांडे, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
चिंचोलीच्या एस. व्ही.आय.टी. येथे टेक्निकल फेस्टिव्हलमध्ये विद्यार्थ्यांचे नाविन्यपूर्ण संशोधनातून यश







