सोनई : नेवासा येथील संत ज्ञानेश्वर संस्थानच्या वतीने शहर टाकळी (ता.शेवगाव) येथील इयत्ता तिसरीत शिक्षण घेत असलेल्या नऊ वर्षाच्या आस्था गणेश गवळी हिने मंदीरात दिलेली सेवा तसेच तिचे गायन व संस्कृत पाठांतर विषयी सत्कार करण्यात आला. यावेळी तिने वरुथिनी वद्य एकादशीनिमित्त भजन संध्या मध्ये भाग घेऊन धार्मिक गीत सादर केले. तिने गारन केलेल्या ‘संत ज्ञानेश्वर आष्टक’ चे विशेष कौतुक करण्यात आले.मंदिरातील कार्यक्रम झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर संस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग व विश्वस्त वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के यांच्या हस्ते आस्था गवळी हिचा शाल, श्रीफळ व प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दादा महाराज वायसळ, आनंदवन सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष विनायक दरंदले, किशोर घावटे व पालक गणेश गवळी उपस्थित होते. वेदांताचार्य म्हस्के महाराज यांनी गुणी मुलीला संगित व गायन क्षेत्रातील उच्च शिक्षण द्यावे अशी सुचना पालकास केली.
————————–
संत ज्ञानेश्वर संस्थानच्या वतीने चिमुकल्या आस्था गवळीचा विशेष सत्कार







