आ. लंघे यांनी केला सन्मान.
सोनई –१९-खरवंडी ता. नेवासा येथील रहिवासी व आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरूकुल, कोकमठाण (ता. कोपरगाव) शाळेचा विद्यार्थी चि.नेहे सोहम रेखा भिकनदास याची जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६-२७ साठी निवड झाल्याबद्दल नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या उल्लेखनीय यशाबद्दल चि.नेहे सोहम याचे आ.विठ्ठलराव लंघे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संपूर्ण नेहे परिवार उपस्थित होता.







