शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

समाजकल्याण विभाग वंचितांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध – अपर जिल्हाधिकारी रेश्मा माळी

---Advertisement---

सामाजिक समता सप्ताहानिमित्त विविध उपक्रम : ज्येष्ठ नागरिक कार्यशाळा, आरोग्य व रक्तदान शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

अहिल्यानगर : दुर्लक्षित व वंचित घटकांच्या कल्याणासाठी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी समाजकल्याण विभाग सातत्याने कार्यरत आहे. या प्रयत्नांमुळे लाभार्थ्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडत असल्याचे प्रतिपादन जिल्हा जात पडताळणी समितीच्या अध्यक्षा तथा अपर जिल्हाधिकारी श्रीमती रेशमा माळी यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने आयोजित सामाजिक समता सप्ताहांतर्गत सावेडी नाका येथील पुण्यश्लोक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात दि.१३ एप्रिल २०२६ रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सहायक आयुक्त (समाजकल्याण), जिल्हा जात पडताळणी समिती तसेच विविध महामंडळांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये जात पडताळणी प्रमाणपत्रांचे वितरण, ज्येष्ठ नागरिक कार्यशाळा, आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार, जिल्हा समाजकल्याण अधिकारी देविदास कोकाटे, जिल्हा जात पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी अनिल तिदमे, समाजकल्याण विभागाच्या विशेष अधिकारी श्रीमती लबडे तसेच महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे प्रादेशिक अध्यक्ष शब्बीर पठाण आदी उपस्थित होते.
यावेळी सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांनी आपल्या अधिकारक्षेत्रात जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली.
ज्येष्ठ नागरिक कार्यशाळेत जिल्ह्याचे भूषण असलेले कवी, लेखक व व्याख्याते सुभाष सोनावणे यांनी शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेत ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांवर प्रकाश टाकला. तसेच कुटुंब व समाजाने आपापल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडण्याची गरज अधोरेखित केली.
महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या प्रादेशिक विभागाचे सचिव चौधरी पाटील यांनी सहायक आयुक्तांच्या कार्याचे कौतुक केले.आरोग्य व रक्तदान शिबिरासाठी जिल्हा रुग्णालयाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत डॉ. वैशाली बोथे व त्यांची टीम उपस्थित होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजकल्याण निरीक्षक सकलेन सय्यद यांनी केले, तर आभार प्रदर्शन वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक श्रीमती संगिता चितळे-नांदरे यांनी केले.


Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment