सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये आयसीयु टेक्निशियन या अभ्यासक्रमाच्या मार्च 2026 परीक्षेचा 100% टक्के निकाल लागला असून, विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत नंदिनी शिंदे यांनी 83.25% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच विनोद गाडेकर यांनी 80.00% गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला असून, अनुष्का मोरे यांनी 79.75% गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला आहे.सर्व विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊन १००% निकालाची परंपरा कायम ठेवली असून, या यशाबद्दल संस्थेचे संचालक सागर लुंकड व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रम, सातत्य आणि गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनामुळे हे यश शक्य झाल्याचे मत यावेळी दिलीप गालफाडे यांनी व्यक्त केले.सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट ही पॅरामेडिकल क्षेत्रात उत्कृष्ट शिक्षण देणारी संस्था असून, विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम बनवत आहे.
१००% निकालासह सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटची यशस्वी परंपरा कायम







