शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

तुकाराम मुढेच्या कारवाईला समर्थन दर्शवण्यासाठीभर उन्हात श्रीरामपूर-शिर्डी पदयात्रा

---Advertisement---

श्रीरामपूर : आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे नुकतेच अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी रुजू झाल्यानंतर बहुतेक दूध संकलन केंद्रावर छापे टाकून किलो पामतेलाचा साठा, रसायन, केमिकल साठा जप्त केला आहे. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या भेसळ मुक्त कारवाईला पाठिंबा देण्यासाठी श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी डोक्यावर भारतीय संविधान घेऊन संविधान लिहिलेले पोस्टर व तुकाराम मुंढे समर्थनार्थ असलेले पोस्टर अंगात परिधान करून भर उन्हात वाकडी मार्गे श्रीरामपूर ते शिर्डी पायी पदयात्रा केली.आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांची गेल्या २१ वर्षातही त्यांची २५ वी बदली आहे. त्यांच्या कार्यशैलीप्रमाणे अन्न आणि औषध विभागात रुजू झाल्यानंतर त्यांनी कारवाईचा धडाका लावला आहे. प्रशासनाच्या आयुक्तपदी रुजू होताच राज्याच्या एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांची जोरदार मोहीम राबवली जात आहे. सोलापूर जिल्ह्यातही अन्न व औषध प्रशासन विभागानं कारवाईचा दणका दिला आहे. अशा प्रकारच्या कारवाया करून दोषींविरुद्ध कडक धोरण अवलंबविल्याबद्दल त्यांच्या समर्थनार्थ अशोक लोंढे यांनी डोक्यावर भारतीय संविधान घेऊन संविधान लिहिलेले पोस्टर व तुकाराम मुंढे समर्थनार्थ असलेले पोस्टर अंगात परिधान करून भर उन्हात वाकडी मार्गे श्रीरामपूर ते शिर्डी पायी पदयात्रा केली.वाकडी ते श्रीरामपूर रस्ता दुरुस्तीसाठी अशोक लोंढे यांनी अनेक वेळा आंदोलन केली होती. त्याच रस्त्याने लोंढे यांनी पद यात्रा करत तुकाराम मुंढे यांच्या भेसळ मुक्त कारवाईला पाठिंबा दिला आहे. दुधाच्या आवक पेक्षा तीपटीने दूध निर्यात होत असताना अन्न व औषध प्रशासन करते काय ? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. लोंढे यांच्या या समाजसेवी व मानवी आरोग्याच्या दृष्टीने योग्य असलेल्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment