शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

संतांविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या विकास लवांडेचा श्रीराम सेवा मंडळाच्या वतीने निषेध

---Advertisement---

नेवासा : महाराष्ट्रातील वीसहून अधिक संत महंत यांना घुसखोर म्हणून पत्रकार परिषद व सोशल मीडियाद्वारे बेताल वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विकास लवांडेचा श्रीराम सेवा मंडळाच्या वतीने त्रिव शब्दात निषेध करण्यात आला.सदर व्यक्तीवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नेवासा तालुक्यातील देवगाव,भेंडा व देवगड भक्त परिवार व श्रीराम सेवा मंडळाच्या भाविकांनी नेवासा तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे केली आहे
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की गुरुवारी दिनांक १६ एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विकास लवांडे नामक व्यक्तीने सामाजिक न्याय व्यवस्था व स्वास्थ्य संकटात यावे म्हणून तसेच हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखाविण्याच्या हेतूने राज्याचे वैभव असलेल्या वारकरी संप्रदायातील विविध साधू,संत महंत यांची नावे घेऊन त्यांना घुसखोर सारखा शब्द वापरून प्रचंड मोठा अपमान केला आहे.
यामुळे प्रचंड रोष सकल हिंदू समाजाच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. या व्यक्तीला अटक न झाल्यास प्रचंड मोठ्या प्रमाणावर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल हे याद्वारे कळवू इच्छितो व याची जबाबदारी सर्वस्वी प्रशासनाची राहील असा ईशारा दिला आहे
नेवासा तालुक्यासह पूर्ण महाराष्ट्राला पूजनीय असणाऱ्या देवगड देवस्थानचे परमपूजनीय महंत श्री भास्करगिरीजी बाबा यांच्यासह इतर १९ संत महंत यांच्या बाबत कोणताही विचार न करता, कागदोपत्री पुरावा न देता, कोणत्याही सक्षम न्यायालयांचे निर्णय न घेता, मनाला वाटेल तसे बोलण्याचा अधिकार म्हणून समाजाचे सामाजिक स्वास्थ्य खराब होऊन कायद सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे वक्तव्य विकास लवांडे याने केले आहे.
त्यामुळे या नालायक प्रवृत्तीच्या विकास लवांडे याच्याविरुद्ध तहसील प्रशासनाने व पोलिस प्रशासनास हाताशी स्वतः हून फिर्याद नोंदवून घ्यावी व कठोर कारवाई करावी अन्यथा भविष्यात होणाऱ्या विविध आंदोलन, मोर्चे व त्यातून निर्माण होणाऱ्या कायदे सुव्यवस्थेचे प्रश्वास आपण दोन्ही प्रशासन जबाबदार राहतील असा ईशारा निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी श्रीराम भक्त मंडळाचे देवगाव व भेंडे व देवगड भक्त परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment