श्रीरामपूर : दरवर्षीप्रमाणे श्रीराम अॅकेडमी शाळेने C.B.S.E. बोर्डातील परीक्षेत 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे. सदर परीक्षेत नमिष अग्रवाल या विद्यार्थ्याने 97.8% गुण मिळवून तालुका व शाळेत प्रथम क्रमांकाचा मान मिळविलेला आहे. तसेच दर्श सेवक 97.6%, कु. मोक्षा गोहील 94%, कु. पूर्वा राणेजा 93%, कु. श्रीजा शिंदे 92.6% व जय मरलेचा 99.6% हे सर्व विद्यार्थी 90 टक्क्यांच्या पुढील गुणांच्या श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
तसेच नमिष अग्रवाल, मोक्षा गोहील, दर्श सेवक व जय मरलेचा या विद्यार्थ्यानी IT या विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त केले. सदर शाळेच्या यशस्वी निकालासाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक वृंद, पालकवर्ग यांनी मेहनत घेतली आहे. सदर परीक्षेतील यशाबद्दल शाळेचे चेअरमन श्री. राम टेकावडे, खजिनदार जन्मेजय टेकावडे, प्राचार्या पोटघन मॅडम, सल्लागार समिती सदस्या सौ. उषा मुंदडा, कासलीवाल मॅडम, बाळासाहेब ओझा, अॅड. औताडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
श्रीराम अॅकेडमीचा सी.बी.एस.ई. बोर्ड परीक्षेत 100% निकाल







