श्रीरामपूर : रविवार दि.२४ ते ३० मे २०२६ या काळात आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमद भागवत कथासप्ताह सुरु असून या पवित्र भक्तीकथांचा भक्त,रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन माऊली वृद्धाश्रम व जानकी माऊली निराधार विद्यार्थी वसतिगृह संस्थापक, अध्यक्ष सुभाष वाघुंडे यांनी केले. श्रीमद भागवत कथा सादरीकरण निरूपणात हभप डॉ. पुरुषोत्तम कोळपकर महाराज, हभप भागवतराव मुठे पाटील महाराज, हभप अशोकराव शिंदे महाराज आणि हभप सौ. कल्पनाताई वाघुंडे हे भाग घेणार आहेत. प्रारंभी प्रा.डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी श्रीमद भागवत ग्रंथाचे महत्त्व सांगून कथाकार,निरुपण कर्ते यांचा परिचय करून दिला. सुभाष वाघुंडे यांनी सर्वांचे स्वागत करून माऊली वृद्धाश्रमाचे उपक्रम सांगितले. श्रीमद भागवतकथा सप्ताहाचे ग्रंथपूजन, श्रीप्रतिमा पूजन माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, कचरू निकम, किशोर गाढेगुरूजी, सौ.गीतांजली गाढे, पत्रकार राजेंद्र देसाई, दिलीप गिरमे, दत्तात्रय खिलारी, संतोष भालेराव, रामेश्वर भोर, सोमनाथ साळुंखे, लक्ष्मीकांत जेजुरकर, लताताई जाधव, बाळासाहेब यादव,ताराबाई अग्रवाल, सुमन भालेराव, अरुणराव विसपुते, सौ. वंदनाताई विसपुते, लक्ष्मणराव पिसे, पुंजा आघाव,शुभम नामेकर,आश्रमातील वृद्ध मातापिता, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. सूत्रसंचालन डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले. हभप डॉ. कोळपकर महाराज यांनी गीतगायनाने कथा निरुपणास सुरुवात केली. श्रीमद भागवत कथारहस्य प्रथमसूत्र हभप भागवतराव मुठे पाटील यांनी सांगितले. अशोकराव शिंदे महाराज व हभप सौ. कल्पनाताई वाघुंडे यांनी विविध कथा निरूपण करून पहिल्या दिवशी भक्त भाविकांना मंत्रमुग्ध केले.
माऊली वृद्धाश्रमात श्रीमद भागवत कथा सप्ताह







