नेवासा : कर्मभूमी असलेले पुणे येथील सोशल वर्कर अजय अंबादास कुलकर्णी यांना श्री सिद्धेश्वर बहुउद्देशीय संस्थेचा राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्कार शुक्रवारी नेवासा येथे झालेल्या कार्यक्रमात श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य रघुनाथराव आगळे सर यांच्या हस्ते व नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. नेवासा येथील औदुंबर चौकात असलेल्या हॉटेल प्रणामच्या सभागृहात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य रघुनाथराव आगळे सर होते होते तर नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले, माजी नायब तहसीलदार चंद्रकांत कांदे,जेष्ठ व्यापारी विजय गांधी,शिवसेना नेते भाऊसाहेब वाघ,बालेंद्र पोतदार,नवोदयचे माजी प्राचार्य अन्सार शेख सर,किशोर गारुळे,प्रा.सुनील गर्जे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.यावेळी श्री सिद्धेश्वर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शांतवन खंडागळे यांनी आलेल्या अतिथींचे स्वागत करून प्रास्ताविक केले.संस्थेने राबविलेल्या वार्षिक उपक्रमाची माहिती त्यांनी दिली. यावेळी बोलतांना नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले यांनी अजय कुलकर्णी यांनी समाजात देत असलेल्या योगदानाचे कौतुक केले उपेक्षित कलाकारांना रंगमंच उपलब्ध करून देणारे अजय कुलकर्णी यांनी सांस्कृतिक चळवळ निर्माण केली असल्याचे सांगत त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. माजी प्राचार्य रघुनाथराव आगळे सर म्हणाले की अजय कुलकर्णी यांचे वडील अंबादास कुलकर्णी यांनी नेवासा येथे तहसीलदार असतांना तालुक्याच्या हितासाठी कामे केली.अजय कुलकर्णी यांनी देखील कॉलेज जीवनात अनेक तालुक्यातील कलाकारांना प्रोत्साहित केले आज त्यांना मिळालेला कलाभूषण पुरस्कार ही कौतुकास्पद गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना प्राचार्य आगळे सरांनी भरपूर पाठबळ देऊन मार्गदर्शन केले त्यांनी दिलेली संस्काराची शिदोरी आज जीवनात कामी येत असल्याचे सांगत त्यांनी गुरूंच्या हस्ते माझ्या सारख्या शिष्याचा कलाभूषण पुरस्कार देऊन सन्मान होतो हीच माझ्या जीवनातील अविस्मरणीय भेट असल्याचे उदगार अजय कुलकर्णी यांनी यावेळी बोलतांना काढले. यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी सेवानिवृत्त नायब तहसीलदार भानुदास मोहरे,सुरेशनगरचे सरपंच कल्याणराव उभेदळ,खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष संतोष फिरोदिया,मुद्रांक शुल्क विभागाचे अधिकारी नितीन पाठक,प्रा.राजेंद्र आडसुरे,रमेश अवचरे,अंबादास लष्करे, अँड.प्रदीप वाखुरे,रमेश कणगरे,राजेंद्र परदेशी,अभय मोहिते,महेश मापारी,सुधीर बोरकर,संजय काकडे,संजय वाकचौरे,उद्योजक बाळू मुथ्था,बाळासाहेब कोकणे, वृद्धाश्रम चालक रावसाहेब मगर,सुनील धायजे,शिवा जंगले,दीपक साळवे,नाथा शिंदे,विजय कावरे,राजू शेख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
श्री सिध्देश्वर बहुउद्देशीय संस्थेचा राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्कार अजय कुलकर्णी यांना प्रदान







