शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

शिक्षक शिक्षकेतर सेनेच्या अहिल्यानगर जिल्हा अध्यक्षपदी शशिकांत थोरात

---Advertisement---

बेलापूर – महाराष्ट्र शिक्षक -शिक्षकेतर सेनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पदी बेलापूर येथील बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे शिक्षक शशिकांत थोरात यांची निवड करण्यात आली आहे.आमदार किशोर दराडे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. महाराष्ट्र शिक्षक व शिक्षकेतर सेनेचे काम राज्यभरात अधिक बळकट व्हावे या करीता सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजय चव्हाण यांनी अनेक नवनविन जोमाने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या केल्या त्यात अहिल्या नगर जिल्हाध्यक्ष पदी शशिकांत थोरात यांची तर जिल्हा सरचिटणीस पदी मंगेश पालवे यांची निवड करण्यात आली संघटनेच्या खजिनदार पदी सर्जेराव चव्हाण यांची तर उपाध्यक्षपदी अनिल शिंदे व पर्वत उऱ्हे यांची निवड करण्यात आली सहसचिव पदी संदीप गोसावी यांची निवड करण्यात आली महिला शिक्षिकांचे प्रश्न अडचणी सोडविण्यासाठी महिला आघाडीच्या प्रमुख पदी श्रीमती रुपाली पवार यांची नियुक्ती करण्यात आली आमदार किशोरभाऊ दराडे यांच्या हस्ते सर्वांना नियुक्ती पत्र देण्यात आले.अहिल्यानगर जिल्ह्यातील विनाअनुदानित, अंशकालीन आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत. मागण्यासाठी उचित न्याय मिळेल अशी अपेक्षा या वेळी उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजय चव्हाण यांनी व्यक्त केली या वेळी नाशिक जिल्हा शिक्षक सेनेचे श्री. मधुकर वाघ, श्री योगेश मोजाद, श्री.राम धोंगडे, श्री.सुरेश घराटे, श्री संदीप डोलार, श्री मिथुन डोंगरे,श्री संभाजी पवार, श्री राजेंद्र निमसे आदिसह अहिल्यानगर जिल्ह्यातून शेकडो शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनीं उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment