शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

सोनईत शंकर महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी

---Advertisement---

सोनई – सोनई परिसरात शंकर महाराजांची पुण्यतिथी भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी सोनई शिंगणापूर रस्त्यावरील स्टेट बँक मागील शंकर महाराज मठात सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.पुण्यतिथीनिमित्त महाराजांच्या मूर्तीला अभिषेक पूजन करून आरती करण्यात आली. यावेळी शंकर महाराज मठात फुलांची सजावट करण्यात करण्यात आली होती. यावेळी सोनई परिसरातील असंख्य भक्तांनी शंकर महाराज मठात दर्शन घेऊन महाराजांच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.पुण्यतिथी कार्यक्रमा निमित्त भाविकांच्या वतीने प्रसाद वाटप करण्यात आला.सर्व भाविकांनी मोठ्या श्रद्धेने प्रसादाचा लाभ घेतला.सोनई परिसर शंकर महाराज भक्त परिवार,स्थानिक नागरिक, महिला मंडळ, युवक मंडळ यांनी पुण्यतिथी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सक्रिय सहभाग नोंदविला. संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि आनंददायी झाले होते.शंकर महाराजांच्या पुण्यस्मरणातून समाजात सद्भावना, सेवा आणि अध्यात्मिक मूल्ये जपण्याचा संदेश देण्यात आला.
शंकर महाराजांनी समाजाला अध्यात्म, सेवा आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांच्या विचारांचे अनुकरण करून समाजात सद्भावना आणि सेवाभाव वाढविणे हीच खरी पुण्यतिथी साजरी करण्याची भक्त मंडळाने भावना व्यक्त केली.
यावेळी शंकर महाराज भक्तांनी “अनंत कोटी ब्रह्मांडनायक, राजाधिराज योगीराज सद्गुरू श्री शंकर महाराज की जय” असा जयघोष करत मठ परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment