शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

शनिशिंगणापुर जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

---Advertisement---

सोनई(वार्ताहर)शनिशिंगणापुर जिल्हा परिषद शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात झाला. सहायक पोलीस निरीक्षक अशिष शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास माजी सरपंच बाळासाहेब बानकर, शनैश्वर देवस्थानचे माजी विश्वस्त सयाराम बानकर उपस्थित होते. बाबासाहेब कांबळे यांनी मान्यवरांचा सत्कार केला. चिमुकल्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात ग्रामस्थ व पालकांनी रोख बक्षीस देऊन कौतुक केले. वर्षभरात झालेल्या विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले. तारा काटकर यांनी सुत्रसंचालन केले. अनिता पगडाल यांनी आभार मानले. ————————————

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment