मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाच्या ठरलेल्या विधान परिषद निवडणुकांची मतमोजणी आज पार पडली असून, नाशिक वगळता सर्व १० जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. नाशिकमध्ये बंडखोर गोकुळ गितेंचा विजय झाला असून, इथं महायुतीच्या नरेंद्र दराडे यांचा पराभव झाला आहे. १७ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीतील सहा जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. एकूण १७ पैकी १६ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून, केवळ नाशिकच्या जागेवर अपक्ष गिते यांनी बाजी मारली आहे. नागपूरमधून भाजपाचे राजीव पोतदार विजयी झाले असून, नांदेडमध्ये अमरनाथ राजूरकरांनी बाजी मारली आहे. तर, सांगली-साताऱ्यातून भाजपाचे धैर्यशील कदम विजयी झालेत.१) नागपूरमधून भाजपाचे राजीव पोतदार विजयी२) नांदेडमध्ये अमरनाथ राजूरकर विजयी३) परभणीमध्ये शिवसेनेचे सईद खान विजयी४) लातूर – बीड – धाराशिव मतदारसंघात भाजपचे उमदेवार बसवराज पाटील विजयी झाले५) सोलापूर – भाजप राजेंद्र राऊत विजयी.६) जालना मतदारसंघातून सुहास शिरसाठ विजयी७) सांगली-साताऱ्यातून भाजपाचे धैर्यशील कदम विजयी८) नाशिकमध्ये गोकुळ गितेंचा विजय९) अमरावतीमध्ये भाजपाचे प्रवीण पोटे विजयी झाले आहेत.१०) भंडारा-गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर यांनी बाजी मारली आहे.११) जळगावमध्ये भाजपाचे नंदकिशोर महाजन विजयीबिनविरोध विजयी झालेले सहा उमेदवार कोण?१) ठाणेरवींद्र फाटक (शिवसेना)२) यवतमाळदुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना)३) रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्गअनिकेत तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस)४) पुणेविक्रम काकडे (राष्ट्रवादी काँग्रेस)५) वर्धा – गडचिरोली – चंद्रपूरअरुण लखाणी (भाजपा)६) अहिल्यानगरप्राजक्त तनपुरे (भाजपा)







