शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

सरपंच पतीच्या कारवर पेट्रोल टाकून पेटवली

---Advertisement---

श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद येथे सामाजिक कामातून एका व्यक्तीला मदत केल्याचा राग मनात धरून एका तरुणाने सरपंच पतीच्या कारवर पेट्रोल टाकून ती पेटवून दिली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.श्रीरामपूर तालुक्यातील जाफ्राबाद-खैरी निमगाव रोड परिसरातील शेतगट क्रमांक १०५ येथे शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संदीप भाऊसाहेब शेलार (वय ४९, रा. जाफराबाद) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी सामाजिक कामाच्या निमित्ताने अनिल दशरथ नांगळ यांना मदत केली होती. याच कारणावरून शुभम बाबासाहेब नांगळ (वय २५, रा. नागापूर एमआयडीसी, अहिल्यानगर) याने संतापातून हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.शुभम नांगळ याची महिंद्रा एक्सयुव्ही ५०० (क्र.एमएच ४८ ए ५४२७) ही अंदाजे तीन लाख रुपये किमतीची कार लक्ष्य करत त्यावर पेट्रोल टाकून आग लावली. या घटनेत वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात संदीप भाऊसाहेब शेलार यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी शुभम बाबासाहेब नांगळ विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य हवालदार पी. डी. आगलावे पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment