शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

मुलींसाठी “संत भगवानबाबा कृपा (एसबीके) वसतिगृह” पुण्यात सुरू

---Advertisement---

वंजारी महासंघ महिला आघाडीचा उपक्रम; वंजारी समाजातील मुलींसाठी ५० टक्के जागा राखीव

पुणे : उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि नोकरीच्या निमित्ताने पुण्यात येणाऱ्या मुलींसाठी सुरक्षित, शिस्तबद्ध आणि अभ्यासाला पूरक वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नांदेड सिटी, पुणे येथे “संत भगवानबाबा कृपा (एसबीके) वसतिगृह” सुरू करण्यात येत आहे. वंजारी महासंघ महिला आघाडीच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत असून हे वसतिगृह १ जुलैपासून विद्यार्थिनींसाठी खुले होणार आहे.
महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी, यूपीएससी-एमपीएससी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुली तसेच नोकरी करणाऱ्या महिलांसाठी हे वसतिगृह उपयुक्त ठरणार आहे. आधुनिक सुविधा, सुरक्षित वातावरण आणि अभ्यासासाठी आवश्यक सोयी यामुळे विद्यार्थिनींना चांगले वातावरण मिळणार आहे.
वसतिगृहामध्ये प्रशस्त व स्वच्छ खोल्या, वाय-फाय सुविधा, सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्था, स्वतंत्र वाचन कक्ष, भोजन व्यवस्था तसेच वाहन पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला आणि शिस्तीला विशेष महत्त्व देण्यात आले आहे.
या वसतिगृहात वंजारी समाजातील मुलींसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या असून उर्वरित जागा इतर समाजातील विद्यार्थिनींसाठी उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे सर्व समाजातील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी पुण्यात सुरक्षित निवासाची सुविधा मिळणार आहे.
प्रवेशासाठी मर्यादित जागा उपलब्ध असून इच्छुक विद्यार्थिनींनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रिया १५ जूनपर्यंत सुरू राहणार असून त्यानंतर रिक्त जागांसाठी गुणवत्ता यादीच्या आधारे प्रवेश देण्यात येणार आहेत.
वसतिगृहाच्या संचालिका डॉ. सुवर्णा भारत कऱ्हाड असून विद्यार्थिनींना सुरक्षित, सुसंस्कृत आणि अभ्यासकेंद्रित वातावरण उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रवेशासाठी आणि अधिक माहितीसाठी ८६२६०६१३५१ या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन वंजारी महासंघाचे अध्यक्ष श्री. गणेश खाडे सर यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment