श्रीरामपूर : चांगली पिढी घडविणे हे शिक्षकाचे कर्तव्य असते आणि हे कर्तव्य सायराताई शेख यांनी आपल्या सेवा कार्यातून अनेक चांगल्या पिढ्या घडविल्या.आजचा हा समारंभ त्याची साक्ष आहे. त्यांनी अतिशय कष्टाने आपले विद्यार्थी तयार केले. त्याबद्दल त्या निश्चितच कौतुकास पात्र आहेत असे प्रतिपादन नगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले.
एकलहरे जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका शेख सायरा हसन यांच्या निरोप समारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून करण ससाणे हे बोलत होते.अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे होते. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष कांचन सानप,शिक्षण मंडळाचे माजी सभापती दिलीप सानप, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सलीमखान पठाण, पत्रकार लालमोहम्मद जहागीरदार, एकलहरेचे सरपंच अनिस जहागीरदार, डॉ. तोफिक शेख, विक्रीकर आयुक्त अनिल काळे, राजू इनामदार, बाबासाहेब पिलगर, नगरसेवक रितेश एडके, शाहीनअहमद शेख, साजिद मिर्झा आदि उपस्थित होते. यावेळी एकलहरे शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांतर्फे सन्मानचिन्ह, मानपत्र,शाल व बुके देऊन श्रीमती सायरा शेख यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी रितेश एडके, श्रीमती साळुंके, फायजा शेख, आमेना ईनामदार,महेक शेख, फिरदौस शेख,अलिषा शेख, आलिया सय्यद,स्वालेहा शेख यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक व सूत्रसंचलन साजिद कुरेशी, मतिन मणियार यांनी केले तर फिरोज शेख यांनी आभार मानले.
कार्यक्रमास आर्मी ऑफिसर सादिक मुगल, असला मुगल, अरुण शेख, पीएसआय इक्बाल शेख,अर्शद इनामदार, एडवोकेट फिरोज इनामदार, इंजिनीयर शहजाद शेख,नर्गिस इनामदार, नसरीन ईनामदार, जब्बार सय्यद,अर्जुन बडोगे, किशोर साळुंके, आढाव, श्रीमती साळुंखे, श्रीमती पवार, मुख्याध्यापक हारुण कुरेशी, जहीर काकर,फारुक काकर, साबेरा इनामदार,महेरू शेख यांचेसह शिक्षक पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सायराताई शेख यांनी पिढी घडविण्याचे कार्य केले- ससाणे







