शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

दक्षिण सोलापूरच्या विकासाला गती देण्यासाठी मंत्रालयात जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

---Advertisement---

शिक्षण, आरोग्य व पायाभूत सुविधांवर भर

मुंबई : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आज मंत्रालयात सविस्तर आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यावर विशेष भर देण्यात आला.शिक्षण, आरोग्य, रस्ते तसेच इतर पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावणे हे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले. गावागावातील शाळांची स्थिती सुधारून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, आरोग्य उपकेंद्रे व दवाखाने अधिक सक्षम होऊन नागरिकांना तातडीच्या सेवा मिळाव्यात, तसेच स्मशानभूमी आणि रस्त्यांसारख्या मूलभूत सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना ठोस सूचना देण्यात आल्या.सीमावर्ती भागातील गावांमध्ये पाणी, वीज, रस्ते, शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित अडचणी तात्काळ दूर करण्याचे निर्देश देण्यात आले.तसेच हत्तरसंग कूडळ संगम, जि. सोलापूर या तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्याला उच्चाधिकार व शिखर समितीची मान्यता मिळवून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्याबाबत चर्चा झाली.“दक्षिण सोलापूरचा विकास हा केवळ कागदावर किंवा घोषणांपुरता मर्यादित न राहता तो प्रत्येक गावात आणि प्रत्येक घटकापर्यंत प्रत्यक्षात दिसला पाहिजे. शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधा या क्षेत्रात कोणतीही तडजोड न करता प्रशासनाने अधिक वेगाने आणि परिणामकारक काम करावे,” असे यावेळी स्पष्ट निर्देश देण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment