शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

AIF अंतर्गत कृषी ड्रोन साठी जिल्हा सहकारी बँकांमार्फत कर्जयोजना चालू करण्यासाठी कृषिमंत्र्यांना निवेदन

---Advertisement---

अहिल्यानगर : जिल्हा बँकांमार्फत ॲग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड (AIF) अंतर्गत कृषी ड्रोनसाठी विशेष कर्जयोजना सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रभाकरम फाउंडेशनच्या वतीने कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे करण्यात आली. यावेळी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या मागणीबाबत सकारात्मक भूमिका दर्शविली.कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना कमी खर्चात आणि अधिक कार्यक्षम पद्धतीने फवारणी सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी कृषी ड्रोनची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः युवक आणि ग्रामीण उद्योजकांना कृषी ड्रोन व्यवसायासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी सुलभ कर्जपुरवठा आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. कृषी ड्रोन क्षेत्राला चालना मिळाल्यास शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार होऊन उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होईलयावेळी प्रभाकरम फाउंडेशनचे विपुल तापकीर आणि निखिल कवडे उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment