- भगवती भजन, फेर , पाळणा व जोगवा गायनाने आणली रंगत
श्रीरामपूर : तालुक्यातील वडाळा येथील श्री क्षेत्र रेणुका देवी आश्रमात नुकताच जगन्मातेचा दशकपूर्ती जन्मसोहळा अभिषेक महापूजा, द्राक्ष अर्चन, पुष्पांजली महाआरती व महाप्रसाद वितरण करून उत्साहात संपन्न झाला रामकृष्ण नगर महिला भजनी मंडळाने सुंदर भजन, पाळणा, जोगवा सादर करून उत्सावात रंगत आणली.
प्रारंभी सौ व श्री अशोकसिंग राजपूत, सौ व श्री संकेत जोशी ( चाळीसगाव ) यांच्या हस्ते महापूजा व महाआरती झाली पौरोहित्य महेश गुरू पावसे , श्रीपाद गुरू मेंगदे, ओंकार गुरू कुलकर्णी, गणेश गुरु कुलकर्णी यांनी केले,
यावेळी दशकपूर्ती बदल माहिती देताना विश्वस्त आदिनाथ जोशी म्हणाले की, शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या प्रमाणानुसार व मौनयोगी सद्गुरू रेवणनाथ महाराज यांच्या आज्ञेप्रमाणे सन २०१८ पासून रेणुका देवी जन्मोत्सव साजरा केला जातो. चैत्र महिन्यात चैतन्य असते, प्रभु राम जन्म, हनुमान जयंती असते ती मोठ्या प्रमाणात सर्वत्र साजरी होते मात्र देवीचा जन्मोत्सव कमी ठिकाणी साजरा होतो. आगामी काळात आदिशक्ती उपासकांनी जरूर जन्मोत्सव साजरा करावा अथवा सहभागी व्हावे असे आवाहन केले
बरोबर ११ वाजून ११ मिनिटांनी फुलांचा व पाकळ्यांचा वर्षाव करून जन्मोत्सव साजरा केला.
यावेळी आश्रमाच्या मुख्य विश्वस्त श्रीमती नलिनी देवी जोशी , तसेच श्रीमती शैलजा सातभाई,रंगनाथ मेंगदे गुरुजी, सौ व श्री अरूण धर्माधिकारी, श्री जवळकर , प्राणेश कुलकर्णी ( छत्रपती संभाजी नगर)श्री गुणवंत फुटाणेवाले (नेवासा), श्री भालचंद्र कुलकर्णी तसेच ब्राह्मण युवा मंचचे सुबोध शेवतेकर ,प्रतिक वैद्य, मंदार पावसे, महेश जोशी,सचिन कुलकर्णी यांची उपस्थिती होती. सोहळा यशस्वीते साठी रेणुका उपासना परिवाराचे अभिनव कुलकर्णी, दत्तात्रय राऊत , अर्जुन राऊत, श्रीमती रोहिणी कुलकर्णी, सौ श्वेता कुलकर्णी, कु वैष्णवी राऊत , सौ वैदेही मेंगदे आदीसह महाप्रसाद करीता परिसरातील कुलकर्णी व राऊत परिवारातील महिला व बालकांनी विशेष परिश्रम घेतले. आश्रमातचे विश्वस्त सेवक सौ आदिती व आदिनाथ जोशी यांनी संयोजन केले.महाप्रसाद व तांबुल (विडा) प्रसाद वाटपाने दशकपूर्ती उत्सवाची सांगता झाली







