श्रीरामपूर : गुणवत्तापूर्ण शिक्षणाची उज्ज्वल परंपरा जपत रामराव आदिक पब्लिक स्कूलने दहावीच्या परीक्षेत यंदाही निकालाची उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. विद्यार्थ्यांच्या घवघवीत यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
यंदाच्या परीक्षेत स्नेहा गुंड हिने ९१.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. साई पाटील याने ८६.२० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर शिफा शेख हीने ८५.८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक संपादन केला. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, अथक परिश्रम आणि विद्यार्थ्यांची जिद्द यांचा मोठा वाटा आहे.या विद्यार्थ्यांना विजय शेळके, दिलीप वैराळ, रेणुका लांडे, अर्चना सातदिवे, प्रतिभा आढाव, स्नेहल गवळी, हर्षदा रणच्छोड , फिजा पटेल, गीतांजली ताके या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले
विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे कार्यकारी विश्वस्त अविनाश आदिक ,विश्वस्त अनुराधा आदिक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले.
दहावीच्या परीक्षेत रामराव आदिक पब्लिक स्कूलची उज्ज्वल कामगिरी.







