शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

राहुरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक

---Advertisement---

मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अहिल्यानगर :- राहुरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक २०२६ च्या अनुषंगाने मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे द्वितीय प्रशिक्षण दिनांक १२ व १३ एप्रिल २०२६ रोजी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील नानासाहेब पवार सभागृह व सावित्रीबाई फुले हायस्कूल येथे पार पडले. या प्रशिक्षणासाठी १ हजार ८३४ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रशिक्षण स्थळी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेची सैद्धांतिक माहिती देण्यासोबतच ईव्हीएम मशीन हाताळणीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देण्यात आले.
या प्रशिक्षणास निवडणूक निरीक्षक (भा.प्र.से) देवानंदा रेयांग, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. पंकज आशिया, निवडणूक निर्णय अधिकारी अनुप सिंह यादव, जिल्हा नोडल अधिकारी गौरी सावंत व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अमित पवार यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रशिक्षणाची मुख्य जबाबदारी राहुरीच्या निवासी नायब तहसीलदार संध्या दळवी यांनी पार पाडली.
हा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता निवडणूक नायब तहसीलदार बडे, महसूल नायब तहसीलदार बाचकर, सर्व मंडळ अधिकारी, राहुरीचे ग्राम महसूल अधिकारी, सर्व झोनल अधिकारी व मनुष्यबळ व्यवस्थापन कक्षातील अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.


Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment