हिंदुत्ववादी संघटनांनी कारवाई करावी म्हणून निवेदन दिले
श्रीरामपूर : दोन दिवसापूर्वी हिंदूविरोधी शरद पवार गटाच्या विकास लवांडे याने पत्रकार परिषद घेत हिंदू धर्मातील महंताविषयी चुकीचे भाष्य केले. चुकीचे भाष्य करणाऱ्या लवांडेचा याच्या विरोधात श्रीरामपूर येथील श्रीराम मंदिर चौक येथे वारकरी संप्रदाय आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन निषेध व्यक्त करत कठोर कारवाई करावी अशी मागणी करत पोलिस प्रशासनास निवेदन देण्यात आले आहे.
लवांडे यांनी ज्या संताविषयी चुकीचे भाष्य केले त्यात अयोध्या श्रीराममंदिर (राष्ट्र मंदिर) याचे कोषाध्यक्ष गोविंददेवगिरी महाराज, सरला बेटाचे मठाधिपती धर्मरक्षक रामगिरी महाराज, देवगड संस्थानचे भास्करगिरी महाराज व इतर महाराज यांचा समावेश आहे. ज्या वारकरी संप्रदायातील महंतानी आपल्या जीवनावर तुळशीपत्र ठेवले आणि या हिंदू धर्माच्या कार्यात वाहून घेतले यांच्या विषयी चुकीचे भाष्य करणे हा गुन्हा आहे. वारकरी संप्रदाय शांत दिसत असला तरी आम्ही जशाच तसे उत्तर देण्याची क्षमता ठेवतो, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी श्रीरामपूर तालुक्यातील महाराज, हिंदुत्ववादी संघटनेतील कार्यकर्ते उपस्थित होते.







