शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

स्वच्छता अभियानातून प्रवरा कृषि शास्त्र संस्थेचा प्लास्टिकमुक्त परिसराचा संदेश

---Advertisement---

लोणी : लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा कृषि शास्त्र संस्थेने महाविद्यालयीन परिसरात स्वच्छता अभियान राबवून “प्लास्टिकमुक्त परिसर” हा महत्त्वपूर्ण संदेश दिला.संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रेरणेने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुश्मिता विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि कृषि संचालक डॉ. उत्तमराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमाअंतर्गत संपूर्ण महाविद्यालय परिसराची स्वच्छता करण्यात आली. परिसरातील प्लास्टिक व इतर कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. अमोल खडके, कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. स्वरांजली गाढे आणि कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष वर्पे यांनी विद्यार्थ्यांना परिसर कायमस्वरूपी प्लास्टिकमुक्त ठेवण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी आणि ते शिक्षणाबरोबरच सामाजिक कार्यातही पुढे असावेत, या उद्देशाने संस्थेमार्फत विविध उपक्रम राबवले जातात. “आम्ही कचरा करणार नाही, तुम्हीही करू नका” हा संदेश देत विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. याचबरोबर त्यांनी फळझाडांना पालापाचोळ्याचे आच्छादन करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण गायकर यांनी केले. हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रा. संदीप पठारे, प्रा. प्रदीप मखरे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment