शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

स्वच्छता अभियानातून प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा हरित संदेश

---Advertisement---


लोणी : लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील
प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालय, लोणी येथे ग्रीन कॅम्पस क्लबच्या वतीने भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आला.अशी माहीती प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी दिली
संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, विश्वस्त माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनी ताई विखे पाटील,भाजपाचे उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, सचिव भारत घोगरे पाटील
या अभियानात सर्व विभाग प्रमुखांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयातील विविध विभाग, क्रीडांगण व संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली. शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वच्छतेचा संदेश दिला.
ग्रीन क्लबचे समन्वयक प्रशांत चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना ग्रीन क्लबची उद्दिष्टे समजावून सांगितली. पर्यावरण संरक्षण, प्लास्टिक मुक्त परिसर, जल व्यवस्थापन, वृक्षारोपण आणि शाश्वत विकास यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबींवर विद्यार्थ्यांनी सजग राहावे असे आवाहन डाॅ.गुल्हाने केले.
महाविद्यालयातील कॉम्प्युटर विभागातील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत ग्रीन क्लबच्या कार्याला हातभार लावला.
परिसर स्वच्छ व हरित ठेवण्यासाठी ग्रीन कॅम्पस क्लबमार्फत विविध उपक्रम सातत्याने राबविले जात असून, या स्वच्छता अभियानातून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment