शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

गुन्हेगारीविरोधात पोलिसांचा आक्रमक पवित्रा; कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

---Advertisement---

नेवासा : नेवासा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांनी पदभार स्वीकारताच तालुक्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
तालुक्यात शांततेला बाधा आणणाऱ्या व्यक्तींवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करून त्यांना स्थानबद्ध करण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कोणालाही कायदा हातात घेण्याची मुभा दिली जाणार नाही, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
याचबरोबर, दोन किंवा अधिक गुन्ह्यांमध्ये नाव असलेल्या सराईत गुन्हेगारांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे. अशा व्यक्तींना लवकरच पोलीस ठाण्यात बोलावून ‘ओळख परेड’ घेण्यात येणार असून, त्यांना समज देत अंतिम इशारा दिला जाणार आहे. या प्रक्रियेद्वारे गुन्हेगारी प्रवृत्तींवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
मागील काही घटनांचा संदर्भ देत निरीक्षक ढिकले यांनी सांगितले की, नागरिकांचे सुरक्षित आणि शांत वातावरण राखणे ही पोलिसांची प्राथमिक जबाबदारी आहे. सातत्याने कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले असून, या भूमिकेमुळे तालुक्यातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांच्या या कडक भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment