शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

गर्भलिंग तपासणी केंद्रावर पोलिसांचा छापाडॉक्टर, एजंटसह १० जणांना अटक;

---Advertisement---

शिर्डीजवळील निर्जन भागात उभारले होते केंद्र

राहाता: शिर्डीजवळील पिंपरी निर्मळ परिसरात, ओसाड ठिकाणच्या घरात सुरू असलेल्या गर्भलिंग निदान केंद्रावर पोलिसांनी छापा टाकून डॉक्टर, एजंटसह १० जणांना अटक केली. या कारवाईत तपासणीसाठी आलेल्या महिलांचे पती व नातेवाईकांना अटक करण्यात आली आहे. वैद्यकीय तपासणीनंतर ८ गरोदर महिलांना पोलिसांनी सोडून देण्यात आले. वैद्यकीय यंत्रसामुग्रीसह विविध साहित्य तसेच ३ चारचाकी मोटारी असा एकुण २४ लाख रूपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. श्रीरामपुर विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी ही माहिती दिली.डॉ. राहुल आबासाहेव भनगे, (वय ३४ वर्ष, बीएएमएस., रा.भानसहिवरे, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) व अभिजीत दिलीप भुसाळ, (वय ३० वर्ष, जेएनएम. नसिंग, रा. पिंपरी निर्मळ, ता. राहाता) असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टर व एजंटचे नाव आहे.पिंपरी निर्मळ शिवारातील, लोणी -पिंपरी निर्मळ रस्त्यालगत निळवंडे कालव्याच्या कडेला, शेतातील दोन खोल्यांमध्ये महिलांकडुन १० हजार रूपये घेवुन त्यांची बेकायदा गर्भलिंग निदान तपासणी करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळाल्याने त्यांनी पथक नियुक्त केले व तेथे बनावट गरोदर महिला ग्राहक म्हणून पाठवुन खात्री केली. या सापळ्यात तेथे गर्भलिंग निदान तपासणी सुरु असल्याची खात्री पोलिसांना झाली.त्यानुसार श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केंद्रावर छापा टाकून कारवाई केली. छाप्यात दोन खोल्यांमध्ये गर्भलिंग तपासणीसाठी वापरले जाणारे सोनोग्राफी मशीन, मॉनिटर, बॅटरी वीजपुरवठा यंत्रणा, जेल, वैद्यकीय कागदपत्रे तसेच इतर उपकरणे आढळली. ही सर्व यंत्रसामुग्री पोलिसांनी जप्त केली. घटनास्थळी उपस्थित डॉक्टर, एजंट तसेच संबंधित महिलांना ताब्यात घेण्यात आले असून, संपूर्ण कारवाई पोलिसांनी अत्यंत गुप्ततेने पार पाडली.गर्भलिंग निदान करण्याकरीता आलेल्या ८ महिलांकडे पोलिसांनी विचारपुस केली असता त्या महिला बीड, संगमनेर, नाशिक, नांदगाव, पुणे येथुन त्यांचे नातेवाईकासह आल्या होत्या. त्या सर्व ३ ते ४ महिन्यांच्या गरोदर आहेत व त्यांचे नातेवाईक काही अंतरावरील बाभळेश्वर येथे थांबले होते. त्या महिलांना इटिंगा व वॅगनर या चारचाकी वाहनामध्ये बसवून गर्भलिंग निदान तपासणी केंद्र असलेल्या पिंपरी निर्मळ भागातील निर्जन भागात नेले जात होते.केंद्रात आलेल्या ८ महिलांची लोणी येथील प्रवरा रूग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता त्या गरोदर असल्याचे आढळले. सदर महिलांचे नातेवाईक व पती यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी लोणी ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी डॉ. स्वाती पवार यांच्या फिर्यादीवरून नेवासा तालुक्यातील डॉ. राहुल भणगे व एजंट अभिजीत भुसाळ याच्या विरुद्ध महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीशियन ॲक्ट १९६२ नुसार गर्भधारणापूर्व आणि प्रसुतीपूर्व निदान तंत्र लिंग निवड प्रतिबंधक कायदा १९९४ अन्वये लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपुर येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय व लोणी पोलीस यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment