शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

बोधेगाव परीसरातील फोटोग्राफी क्षेत्रात एक जुन पासून दरवाढ पेट्रोल डिझेल वाढीची फोटोग्राफी व्यावसायिकांना झळ

---Advertisement---

कांबी : पेट्रोल डिझेल दरवाढ तसेच लॅब मालकाने वाढविलेले दर वाढत्या कॅमेरा किंमती वाढलेली महागाई फोटोग्राफी व्यवसायाला मोठा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर, शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परीसरातील फोटोग्राफर बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. वाढलेली महागाई बदलत्या काळातील आव्हाने, वाढती स्पर्धा आणि वेळेची अनियमितता यावर या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. तसेच या सर्व गोष्टींचा विचार करून फोटोग्राफी क्षेत्रात दरवाढ करण्याचा निर्णय असोसिएशन ने घेतला आहे.
बोधेगाव फोटोग्राफर असोसिएशन अध्यक्ष सचिन गवारे व उपाध्यक्ष विशाल कासुळे,यांच्या प्रमुख उपस्थितीत असोसिएशनची बैठक साई लॉन्स येथे आज झाली. यात १ जुन पासून बोधेगाव परीसरातील फोटोग्राफी क्षेत्रात दरवाढ करण्यात येत असल्याचे निश्चित केलेले आहे. प्रसंगी कोषाध्यक्ष अमोल भिसे, सचिव अक्षय कवडे, सहसचिव राम पोटभरे, सल्लागार अमोल म्हस्के, जेष्ठ फोटोग्राफर संजय घुले, उमेश शिंदे,अनवर शेख,सचिन सावळकर, संतोष गंगाधर,राज शेख, निसार शेख,विवेक झांबरे,ऋषी देशमुख, ऋषी कोरडे,शरद कराड,विशाल पांडव,अवि अभंग, भगवान पालवे, महेश घरगणे,जगदिश दसपुते, योगेश गर्जे जय केसभट,शफीक शेख राहुल थोरवे, कृष्णा खेडेकर, गोकुळ गुंजाळ,आदींची उपस्थिती होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment