शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

घरकुल , विहीर लाभार्थ्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची अधिकारी , कर्मचारी यांनी दक्षता घ्यावी: सभापती सुरज पाटील

---Advertisement---

अहमदपूर: घरकुल, विहीर लाभार्थ्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची अधिकारी , कर्मचारी यांनी दक्षता घ्यावी अशा सूचना अहमदपूर पंचायत समितीचे सभापती सुरज बाबासाहेब पाटील यांनी घरकुल, विहित आढावा योजना बैठकीत दिले. याबाबत सविस्तर वृत्त असे की दोन दिवसांपूर्वी अहमदपूर तालुक्यातील एका वयोवृद्ध नागरिकाचा घरकुला संदर्भातला चा व्हिडिओ समाज माध्यमात व विविध माध्यमातून आल्यानंतर सभापती सुरज पाटील यांनी तात्काळ घरकुल, विहीर विभागाच्या आढावा योजनेची बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये कुठल्याही लाभार्थीला पंचायत समिती पर्यंत बिलासाठी यावे लागू नये यासाठी आपण दक्ष राहून सर्वसामान्य नागरिकांची कामे करावे अशा सूचना दिल्या. तसेच या बैठकीत सभापती सुरज पाटील यांनी गावनिहाय घरकुल, विहीर योजनाचा चा आढावा घेतला. मागील दोन वर्षातील पूर्ण, अपूर्ण व प्रगतीपथावर असलेल्या घरकुल, विहिरी कामे याचाही त्यांनी आढावा घेतला. प्रलंबित घरकुल, विहिरीची कामे हे 31 मे 2026 पर्यंत पूर्ण कराव्यात, तसेच लाभार्थीनिहा आढावा सादर करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. तसेच घरकुल, विहीर च्या संपूर्ण कामाच्या मस्टरची मागणी करून तात्काळ ते पूर्ण करून घ्यावे व लाभार्थ्यांना हप्ते वेळेवर टाकण्यात यावे अशा सूचना सुद्धा सभापती सुरज पाटील यांनी दिल्या. येणाऱ्या काळात घरकुलाच्या, विहिरीच्या संदर्भात किंवा अन्य कशाच्याही तक्रार संदर्भात कुठल्याही कर्मचाऱ्याने निष्काळजीपणा करण्याचा प्रयत्न केला तर त्या कर्मचाऱ्याला थेट घरी पाठवण्याचा इशारा सुद्धा सभापती सुरज बाबासाहेब पाटील यांनी सर्व अधिकारी कर्मचारी यांना दिला. या बैठकीस श्रीमती गीते मॅडम सामाजिक वनीकरण अधिकारी ,गटविकास अधिकारी पंकज शेळके घरकुल विभागाचे सर्व अभियंता रोजगार सेवक, तालुका डाटा ऑपरेटर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment