शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

अहिल्यानगरच्या वन्यजीव संरक्षणाला नवे बळ;प्रवरा परिसरातील विकास म्हस्के यांची मानद रक्षकपदी नियुक्ती

---Advertisement---

विखे पाटील यांचा पाठपुरावा; प्राणीमित्राच्या कार्याला शासनाची दखल

सोनगाव : जिल्ह्यातील वन्यजीव संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या प्राणीमित्र विकास म्हस्के पाटील यांची मानद वन्यजीव रक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महसूल व वनविभागाच्या आदेशानुसार ही नियुक्ती जाहीर करण्यात आली असून, जिल्ह्यातील वन्यजीव संरक्षण चळवळीला यामुळे नवे बळ मिळणार आहे.राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी यासाठी विशेष पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश येत विकास म्हस्के पाटील यांच्या नावाची शिफारस मान्य करण्यात आली.महामहिम राज्यपालांच्या आदेशानुसार महसूल व वनविभागाने ही नियुक्ती निश्चित केली. विभागाचे विशेष कार्य अधिकारी उदय ढगे यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.विकास म्हस्के पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून वन्यजीव बचाव, सर्पमित्र सेवा तसेच जनजागृतीच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य केले आहे. ग्रामीण भागात वन्यप्राण्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.त्यांच्या या नियुक्तीमुळे जिल्हा स्तरावर वन्यजीव संरक्षण उपक्रमांना अधिक गती मिळणार असून, त्यांच्या अनुभवाचा लाभ प्रशासनाला होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment