शेवगाव – येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स ॲन्ड सायन्स महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी डॉ. नागेश शिवनाथ मानूरकर यांना बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बीजिंग, चायना या विद्यापीठाची रसायनशास्त्र या विषयात केलेल्या संशोधनाबद्दल विद्यावाचस्पती पदवी प्राप्त झाली आहे. डॉ. नागेश शिवनाथ मानूरकर हे शेवगाव तालुक्यातील हादगाव कांबी या गावचे रहिवासी असून लहानपणी त्यांच्या वडिलांचे छत्र हरपले त्यांच्या आईने अतिशय कठीण परिस्थितीतून डॉ. नागेश यांचे शिक्षण पूर्ण केले. डॉ. नागेश यांच्या या यशाबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, संस्थेचे सचिव ॲड. विश्वासराव आठरे, संस्थेचे सहसचिव मुकेशदादा मुळे, संस्थेचे खजिनदार ॲड. दीपलक्ष्मी म्हसे व सर्व पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे, उपप्राचार्य डॉ. युवराज सुडके आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
न्यू आर्टच्या माजी विद्यार्थ्याला चायना बीजिंगची पीएचडी प्राप्त







