महिला सन्मान होणे काळाची गरज ; आमदार हेमंत ओगले
श्रीरामपूर : महिला सन्मान होणे काळजी गरज आहे. स्त्री- पुरुष भेदभाव न करता पुरुषांच्या बरोबरीने कार्य करणाऱ्या प्रत्येक महिलेचा सन्मान अपेक्षित असल्याचे मत आमदार हेमंत ओगले यांनी केले आहे.
श्रीरामपूर नगरपरिषद आयोजित सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमामध्ये आमदार ओगले बोलत होते. ते यावेळी म्हणाले की, श्रीरामपूर नगर परिषदेने अतिशय स्तुत्य उपक्रम केला मी त्यांना मनापासून धन्यवाद देत असल्याचे म्हटले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष राजश्री ससाणे होत्या तर प्रमुख उपस्थिती सिने अभिनेत्री जान्हवी किल्लेकर यांची होती.
यावेळी नगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले की, श्रीरामपूर नगर परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त सन्मानाने शक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तळागाळातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ज्यांनी कार्य केले त्या महिलांचा सन्मान करण्याचा प्रयत्न नगर परिषदेने केला आहे या पुढील काळात देखील श्रीरामपूर नगरपालिका महिला सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन गुजर म्हणाले की, माजी आमदार स्वर्गीय जयंतराव ससाणे यांनी श्रीरामपूर येथे महिला दिनाच्या निमित्ताने भव्य – दिव्य कार्यक्रम घेतले आज नगरध्यक्ष करण ससाणे आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांनी त्याच प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन करून महिला सन्मान केला त्यांचे आभार व्यक्त करतो असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक महिला बालकल्याण समितीच्या सभापती मंजुश्री मुरकुटे यांनी केले तर स्वागत उपनगराध्यक्ष कांचन सानप यांनी केले. आभार उपसभापती रागेश्वरी एडके यांनी व्यक्त केले.
यावेळी मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, माजी सभापती बाबासाहेब दिघे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, सभापती सुधीर नवले, शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, आशाताई दिघे, गटनेत्या वैशाली चव्हाण, नगरसेविका निलोफर शेख, जायदाभी कुरेशी, प्रणिती चव्हाण, सोनिया कक्कड, नवनीतकौर सेठी, जाकीया शेख, शहाला शहा, यास्मिन शेख, वैशाली पोटे, जयश्री पाटील, आशाताई परदेशी, योगिता नागले, स्नेहल खोरे, सभापती राजेंद्र पवार, दिपक वमने, योगेश जाधव, गोपाल लिंगायत, माजी नगरसेविका मंगल तोरणे, संगीता मंडलिक, सुधा कांबळे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीरामपूरातील प्रतीक्षा कोते, कलावती देशमुख, तेजस्वी शिंगारे, डॉ. मोहम्मदी शेख, प्रियंका निकम, विमल गिरमे, मीलाग्रीन कदम, मोनिका जैन, कोमल चौधरी, छाया भोसले, अनिता गायकवाड, दीपा भवर, योगिता महाले, तेजश्री डोखे, कल्पना शेलार, प्रियंका भिसे, शितलकौर टाक, कृष्णमाई भजनी मंडळ या महिलांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानानीत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मते यांनी केले.







