सातारा : टाकेवाडी (ता. माण) येथे आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमास ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना. जयकुमार गोरे (भाऊ) यांनी आज भेट देत मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवदर्शन करून प्रार्थना केली तसेच काल्याच्या कीर्तनानिमित्त पारंपरिक दहीहंडी फोडून सोहळ्यात उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला.या प्रसंगी ह.भ.प. छगन महाराज खडके (काका) यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ व अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून अध्यात्मिक विचारांचा प्रसार, सामाजिक एकोपा आणि धार्मिक परंपरा जपण्याचा संदेश प्रभावीपणे मांडला.सप्ताह सोहळ्यास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. या कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त करत ना. जयकुमार गोरे (भाऊ) यांनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे समाजात अध्यात्म, सद्भावना आणि एकोप्याची भावना अधिक दृढ होते.या कार्यक्रमास मा. सरपंच जालिंदर दडस, सरपंच निलेश दडस यांच्यासह टाकेवाडी गावातील मान्यवर, सन्माननीय सभासद तसेच ग्रामस्थ आणि माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
टाकेवाडी येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास ना. जयकुमार गोरे (भाऊ) यांची उपस्थिती







