शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

कु. सुदी धामणेचे दहावीच्या परिक्षेत यश

---Advertisement---


लोणी : लोकनेते लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरानगर येथील प्रवरा सेंटर पब्लिक स्कूलची विद्यार्थी सुदी दीपक धामणे हिने सीबीएससी बोर्डाच्या परीक्षेत उज्वल यश मिळाल्याबद्दल वरदविनायक सेवाधामचे मठाधिपती महंत उद्धव महाराज मंडलिक आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी सत्कार केला.
अध्यात्म आणि शिक्षण याची योग्य समन्वयक ठेऊन तिने या परीक्षेमध्ये परीक्षेत ९६.८ गुण संपादन करून घवघवीत यश प्राप्त केले आहे.
यावेळी प्रवरा मेडीकल ट्रस्टच्या विश्वस्त सौ.सुवर्णाताई विखे पाटील, औषध निर्माण अधिकारी सुरेखा दरेकर धामणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश धामणे, निवृत्त प्राथमिक शिक्षिका कुसुम कवडे, पालक दीपक धामणे, प्रवरा परिसरातील प्रसिद्ध व्यावसायिक विकी पेंट्स चे संचालक विलास थोरात, प्रवरा आयटीआय कॉलेज लोणी चे प्राचार्य श्री. अर्जुन आहेर उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment