शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

शेळीपालनातून स्वावलंबनाकडे वाटचाल करा -शैलेश देशमुख

---Advertisement---

बाभळेश्वर कृृृषि विज्ञान केंद्रात आयोजित शेळीपालन प्रशिक्षणांस उत्स्फूर्त सहभाग

लोणी : शेतीपूरक व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, योग्य प्रशिक्षण आणि कौशल्य आत्मसात करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख यांनी केले. कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर आणि वॉटर संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेळीपालन प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.कृषी उद्योजकता अभियानांतर्गत युवक आणि शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याचे काम कृषी विज्ञान केंद्रामार्फत सातत्याने सुरू असून, शेळीपालनामध्ये मोठ्या प्रमाणात करिअर आणि स्वावलंबनाच्या संधी उपलब्ध असल्याचे देशमुख यांनी सांगितले.संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. उत्तमराव कदम आणि पायरेन्सचे सचिव डॉ. निलेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विज्ञान केंद्रामध्ये विविध शेतीपूरक व्यवसायांचे प्रशिक्षण सातत्याने राबविले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.प्रशिक्षणामध्ये पशुविज्ञान विभागाचे डॉ. विठ्ठल विखे यांनी शेळीपालनातील आधुनिक तंत्रज्ञान, शेळ्यांच्या जातींची निवड, खाद्य व्यवस्थापन, लसीकरण, रोग नियंत्रण तसेच बाजारपेठ व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पशुधन विकास अधिकारी डॉ. करण खर्डे यांनी पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना, त्यांचे निकष तसेच सिरोही आणि बीटल जातींची माहिती दिली.यावेळी शेळी शेड बांधणी, संतुलित आहार, कृत्रिम रेतन, करडू संगोपन, विमा योजना तसेच विभागांतर्गत विविध योजनांविषयी माहिती देण्यात आली. खंडाळा येथील प्रगतिशील शेळी उत्पादक चंद्रकांत मुंढे यांनी शेळीपालन व्यवसायातील बारकावे, जातींची निवड, संगोपन, अतितापमानातील काळजी आणि घरच्या घरी प्रथमोपचार याबाबत अनुभव कथन केले.डॉ. प्रियंका खर्डे यांनी शेळीपालन व्यवसायातील गट संघटन, एकत्रित मार्केटिंग आणि संवाद कौशल्य यावर मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणासाठी परिसरातील विविध गावांमधून १०५ शेतकरी, महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. प्रियंका खर्डे यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment