शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

पोषण पंधरवड्या निमित्त प्रभात फेरी व गरोदर माता ओटी भरण संपन्न

---Advertisement---

नेवासा : जीवनसत्व युक्त पोषण आहार व त्याचे गरोदर, स्तनदा मातांसाठी असणारे महत्त्व प्रभात फेरीच्या माध्यमातून कारेगाव येथे महिलांमध्ये जागृती करण्यात आली. तसेच गरोदर मातांची ओटी भरण कार्यक्रम उत्साही व आनंदी वातावरणात करण्यात आला .
नेवासा तालुक्यातील कारेगाव येथे अंगणवाडी सेविका रेणुका सचिन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका शैला डॅनियल मिरपगार व मदतनीस रुक्मिणी आडसुळे यांनी प्रभात फेरी काढली. त्यासाठी गंगोत्री गणेश घोडके,मानसी सतीश पारखे,दिशा प्रवीण सातदिवे,निकिता मंगेश अडसुळे,कपाळी गोरख सातदिवे,अनुप्रिया गोरख सातदिवे, कल्याणी देविदास शिरसाठ,रोझ दिलीप खरात, अनुराधा अनिल शिरसाट व बाबासाहेब सातदिवे व अंगणवाडीतील बालके आदींनी सहभाग घेऊन सहकार्य केले .
आठव्या पोषण पंधरवड्या निमित्त कुपोषण के खिलाफ एक जंग,सही पोषण देश रोशन अशा घोषणा देत महिलांमध्ये जागृती करण्यात आली. तसेच कारेगाव येथील गरोदर माता सौ.वैष्णवी हर्षद घोडके व सौ.भक्ती सुमित पारखे यांची ओटी भरण कार्यक्रम उपस्थित माता भगिनींनी आनंदात व उत्साहात केले.
गरोदर मातांनी गरोदर पणात लोहयुक्त व विविध जीवनसत्त्वयुक्त आहार घेतल्यास बालक कुपोषित होत नाही. सुदृढ बालकाचा जन्म होऊन माता पिता समाधानी,आनंदी राहतात, असे रेणुका चौधरी यांनी उपस्थित महिलांना सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment