अकोले : मॉडर्न हायस्कूलचा माजी विद्यार्थी शैलेंद्र पाटीलबा दराडे याचा काही दिवसांपूर्वी अपघातात दुःखद मृत्यू झाला. वडिलांच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी त्याच्या मुलाची इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा असल्याने अत्यंत कठीण परिस्थिती निर्माण झाली होती.या प्रसंगी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक सुधीर जोशी सर व ज्येष्ठ शिक्षक गणेश जोशी सर यांनी विद्यार्थ्याच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्याला परीक्षेला पाठविण्याची विनंती केली. ग्रामस्थांनीही समजूत काढत संबंधित विद्यार्थ्याला परीक्षेला पाठविले.दरम्यान, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. सुगाव, कुंभेफळ व रेडे परिसरातील ग्रामस्थांनी शैलेंद्र दराडे यांच्या उपचारासाठी लोकवर्गणीतून लाखो रुपये जमा केले होते. मात्र त्यांना वाचविण्यात यश आले नाही. जमा झालेली रक्कम कुटुंबीयांना देण्यातआली.याचबरोबर मॉडर्न हायस्कूलमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सामाजिक बांधिलकी जपत शैलेंद्र यांच्या कुटुंबीयांना २१ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. मुख्याध्यापिका श्रीमती कांबळे मॅडम, उपमुख्याध्यापक सुधीर जोशी, ज्येष्ठ शिक्षक गणेश जोशी, दिलीप झोळेकर, मीनानाथ खराटे तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.वतीने विद्यालयाच्या २१ हजार रुपयांचा धनादेश मुख्याध्यापिका श्रीमती कांबळे मॅडम, उपमुख्याध्यापक सुधीर जोशी व सहाय्यक सचिव योगेश देशमुख यांच्या हस्ते रेडे गावचे पोलीस पाटील माणिक पांडे, भरत नवले, सुरेश साबळे व मधुकर शिंदे, खानापूरचे सरपंच दत्तात्रेय बंदावणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या संवेदनशील उपक्रमाबद्दल समाजातून सर्वत्र कौतुक होत आहे.
अपघातग्रस्त विद्यार्थ्याच्या कुटुंबाला २१ हजारांची मदत करतमॉर्डन हायस्कूलच्या शिक्षकांनी जपली सामाजिक बांधिलकी







