सोनई(वार्ताहर)नेवासा येथे नव्याने बांधण्यात आलेल्या संत शिरोमणी सेना महाराज मंदीराच्या जवळ दहा लाख रुपये खर्चाच्या सभामंडपाचे भूमिपूजन नेवासेचे आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते करण्यात आले.संत सेना महाराज देवस्थानचे मार्गदर्शक नंदकिशोर महाराज खरात यांनी स्वागत केले. अध्यक्ष सचिन महाराज पवार यांनी मंदीर निर्माण व आयोजित आध्यात्मिक उपक्रमाची माहिती दिली. मेहकरचे आमदार सिध्दार्थ खरात, महंत उध्दव महाराज मंडलिक, हरी महाराज भोगे, नंदकुमार महाराज तोडकर, सेना महाराज संघटनेचे राज्याचे अध्यक्ष सयाजी झुंजार, जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत, संत सेना महाराजांचे चोवीसावे वंशज खुशपाल सिंग उपस्थित होते. ————————————-
आमदार विठ्ठलराव लंघेच्या हस्ते संत सेना सभामंडपाचे भूमिपूजन







