शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

वीज पडून मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आमदार अमोल खताळ; मदतीचे ठोस आश्वासन; प्रशासनाला तातडीने पंचनाम्याचे आदेश

---Advertisement---

संगमनेर : संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील साकुरसह हिवरगाव पठार परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. याचवेळी दगडसोंडवाडी येथील मच्छिंद्र झुंबर दुधवडे या तरुणाच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत तरुणाच्या कुटुंबीयांना जी काही मदत करता येईल ती केली जाईल असेही आमदार अमोल खताळ यांनी सांगितले आहे.
हिवरगाव पठार शिवारातील गिर्‍हेवाडी परिसरात दगडसोंडवाडी येथे वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊन पाऊस झाला. या पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे घरांचे नुकसान झाले आहे. याच दरम्यान गिर्‍हेवाडी येथील मच्छिंद्र दुधवडे हे मोटारसायकलवरून घरी जात असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळून त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे दुधवडे कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी असून सरकारच्या वतीने मृत तरुणाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे.

“दगडसोंडवाडी येथे वीज पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद आहे. या दुर्दैवी प्रसंगात मी स्वतः प्रशासनाशी संपर्क साधून मृताच्या कुटुंबीयांना शासकीय मदत तातडीने मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे ज्या-ज्या ठिकाणी शेतकरी बांधवांचे, घरांचे अथवा इतर मालमत्तेचे नुकसान झाले आहे, त्या सर्व ठिकाणांचे तातडीने पंचनामे करून योग्य ती नुकसानभरपाई देण्याबाबत महसूल विभागाला स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. शासन म्हणून आम्ही या कठीण प्रसंगात बाधित कुटुंबे व शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत,”— अमोल खताळ, आमदार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment